इयत्ता ४ थी


विषय- मराठी पाठातील सर्व शब्दार्थ, स्वाध्याय
अ.क्र पाठाचे नाव --- लेखक / कवी
१४ मिठाचा शोध ---- अंजली अत्रे
१५ आनंदाच झाड ----- लीला शिंदे
१६ झुळूक मी व्हावे (कविता---- दा .अ. कारे
१७ म्हणीच्या गमती - ---------------
१८ जननायक बिरसा मुंडा - ---------------
१९ हे कोण गे आई ? (कविता)--- भा . रा. तांबे
२० कोलाज - ---------------------
२१ आभाळमाया (कविता)---- विलास सिंदगीकर
२२ होय , मीसुद्धा!------ राजीव तांबे
२३ मन्हा खांदेस्नी माटी (कविता)---- शकुंतला भा. पाटील
२४ थोर हुतात्मे - --------------
२५ संतवाणी ----- संत तुकाराम,चोखामेळा,शेखमहन्मद

१४ मिठाचा शोध
शब्दार्थ
कुतूहल = उत्सुक्ता जंगल = वन अळणी =चव नसलेले युक्त्ती = कल्पना
झाड = व्रुक्ष पाणि = जल समुद्र = सागर दिवस = दिन
प्रश्न – एका वाक्या उत्तरे लिहा .
१) पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत होता ?
२) आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टी खूप दिवस निरीक्षण केले ?
३) खनिज मिठाला आपन काय म्हणतो ?
४) माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले ?
प्रश्न –गाढलेल्या जागी योग्य शब्द लिहा .
अ) बरेच दिवस त्यान या गोष्टींच ---------------------केल. त्याला खूप ------------ वाटल .
आ) कंदमुळ खाताना रोज थोडा थोडा -----------चाटू लागला .
इ) त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची ----------------
ई) ते पाणी त्यांच्या -----------------नेणन्ही त्याला शक्य होत नव्हंत.
खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा .
१) निरीक्षण करणे-
2)कुतूहल वाटणे -
३) अंगाला झोंबणे-
१५ आनंदाचे झाड
शब्दार्थ ;
फुलोरा =फुलांचा बहर. रुंजी घालणे= भोवती फिरणे . मनमुरादपणे = मनसोक्तपणे .
फन्ना उडवणे = खाऊन टाकणे .
प्रश्न १ ला - एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते ?
२) हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे ?
३) पशुपक्षी ,कीटक-किड्यांचे माहेर कोणते ?
प्रश्न २ रा –कोण कोणास म्हणाले ?
अ) “ दारात कधीही शेवगा लावू नये .घरात भांडणे होतात . हे झाड तुम्ही तोडुन टाका .”
आ) “ मी हे झाड लावल ते जोपासण्यासाठी , तोडण्यासाठी नाही .”
इ) “ अहो , लोक शेंगा तोडुन नेतील , तेव्हा नाही का भांडणार तुम्ही ?”
प्रश्न ३ रा – गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .
अ) हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर -------------पक्ष्यांचा अखन्ड मेळा भरत होता .
आ) अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ ------------झुबळ मला दिसली.
प्रश्न ४ था- ‘कार’ प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा .
उदा .- गीत – गीतकार
अ) संगीत आ ) चित्र इ) नाटक ई) कला
प्रश्न ४ था- खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा .
अ) परोपकार करणे.-
आ) आधार देणे .-
इ) फस्त करणे .-
ई) रुंजी घालणे . –
उ) सुकळी मारणे . –
ऊ) पाळत ठेवणे, -
१६ कविता झुळूक मी व्हावे
शब्दार्थ
सानुली = लहानशी . स्वैर = मोकळेपणा . राईत = बागेत . कानोसा = कान देऊन लक्सपूर्वक ऐकणे .
अंगुली = बिट . पसार = निघून जाणे . संगे = बरोबर . लकेर = गाण्याची तान .
प्रश्न १ ला – एका वाक्यात उत्तरे लिहा .
अ ) कवीला काय व्हावेसे वाट्ते ?
आ) कळीला कसे बोट लावावे , असे कवीला वाटते ?
इ) दिशादिशांतून कवी काय उधळून देतो ?
ई) कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे ?
उ) तुम्हाला काय व्हावेसे वाटते ?
प्रश्न २ रा – गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा .
१ ) घरात कोणी आहे का याचा मी -------------------
२)मांजरीला पाहून उंदीर ---------------------------
३ ) नदीतल्या पाण्यात झाडाची फांदी -----------------
४ ) पक्ष्याने आकाशात ---------------------------------

१७ म्हणींच्या गमती
शब्दार्थ –
पाठोपाठ = लगेच
म्हणी . (आपल्या भाषेमध्ये असे अनेक शब्दसमूह वापरले जातात . त्याना म्हणी असे म्हणतात .)
१) लहान तोंडी मोठा घास .
२) गर्वाचे घर खाली .
३) पळसाला पान तीनच .
४) ऊस गोड लागला म्हणून मूळा सकत खाऊ नये .
५) शहाणाला शब्दाचा मार .
६) घरोघरी मातीच्या चुली .
७) अति तिथे माती .
८) दिव्या खाली अंधार .
९) काखेत कळसा गावाला वडसा .
१०) नाचता यईना अंगण वाकडे .
११) खाईन तर तूपाशी नाही तर उपाशी .
१२) आयत्या बिळात नागोबा .
१३) वासरात लंगडी गाय शहाणी .
१४) पाण्यात राहून मास्याशी वैर करु नये .
१५) सरड्याची धाव कुंपाणापर्यंत .
१६) कुत्र्याची शेपूट नळीत घातळे , तरी वाकडे ते वाकडेच .
१७) गाढवाला गुळाची चव काय .
१८) वानराच्या हाती कोळीत .
 वाचा . समजून घ्या .उतारा पाहून अचूक लिहा. (विरामचिन्हांसह )
राणी आजीला म्हणाली , “बघ ना आजी , आपला सोनू मला चिडवतो . “अरे सोनू इकडे ये .” आजी म्हणाली .सोनू आजीकडे आला . “काय ग आजी ?” सोनू म्हणाला. “अरे तुम्ही दोंघ बहीणभाऊ . मग आपल्या ताईला चिडवतोस ?” आजी म्हणाली . अस्स आहे होय !’ सोनू मनाशीच म्हणाला . ‘अग आजी आम्ही दोंघ खेळतो एक तासभर . तू बघ कोण काय करत ते . मग बोल मला. म्हणतात ना , हातच्या काकणाला आरसा कशाला ?” सोनू म्हणाला .
१८ जननायक बिरसा मुंडा
शब्दार्थ – शेतसारा = शेतजमिनीवरील कर . जनाअंदोलन = लोकानी केलेले आंदोलन .
सक्तमजुरी = अतिशय कष्टाचे काम . किताब = पदवी .
प्रश्न १ ला –एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला ?
२) बिरसा मुंदा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले ?
३) तुरुंगात असताना बिरसा मुंडा यानी कोणता संकल्प केला ?
४) बिरसा मुंडा याना कोणकोणत्या गोष्टींत विशेष रस होता ?
५) बिरसा मुंडा याना लोकानी कोणता किताब बहाल केला ?
प्रश्न २ रा – गाललेल्या जागी योग्य शब्द लिहा .
अ ) संपूर्ण देशाला-------------------- गुलाम बनवून ठेवले होते .
आ) १८९५ मध्ये बिरसा मुंडा याना--------------------- वर्षाची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली .
इ) बिरसा मुंडा याना -------------------------तुरुंगात डांबण्यात आले .
प्रश्न ३ रा –वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा .
१)रस असणे अ)तुरुंगवासाला पाठवणे .
२) असंतोष निर्माण होणे . आ) एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे .
३) कारावास ठोठावणे . इ) टिकणे .
४) संकल्प करणे . ई) देशासाठी लढताना मरण येणे .
५)टिकाव लागणे . उ) रुची असणे , आवड असणे .
६)वीरगती प्राप्त होणे. ऊ) चीड निर्माण होणे .
प्रशन ४ था – ‘जननायक‘ हा किताब बिरसा मुंडा याना मिळाला , तसे खालील किताब कोणाला मिळाले ?
अ ) महात्मा
आ) लोकमान्य
इ) स्वातंत्र्यवीर
ई) नेताजी
उ) क्रांतीसिन्ह
ऊ) लोकनायक
१९ हे कोण गे आई

शब्दार्थ – गडाचे खिन्डार = किल्ल्याचा अरुंद रस्ता . ठायी = ठिकाणी . ओढोणी =ओढून .
वडाची दाढी = वडाची पारंबी . चौफेरी = सगळीकडे . मंडळ =गोलाकार . इतके = एवढे .
उरांत =ह्रद्यात . कापणे = हालणे .
प्रश्न १ ला – एका वाक्यात उत्तरे लिहा .
१ ) पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे ?
२) कवी घाबरुन का पळाला ?
३) कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या ?
४) कवीने वाकुल्या केव्हा एकल्या ?

२० कोलाज
कठीण शब्द
सन्मान . खेलरत्न . अर्जून पुरस्कार . पद्मविभूषण . भारतरत्न .सर्वोच्च . महाराष्ट्र . विक्रम . स्पर्धेत . कौतुक . प्रशिक्षक . व्यवस्थापक . प्रसाएअमाध्येम .
विश्वचषक . इंग्लंड . क्रिकेट . आयुष्यात . कारकिर्द . उत्तम . कात्रण . वर्तमानपत्रे .

‘भारतरत्न ,
‘भारतरत्न ‘ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे . हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो .या राष्ट्रीय सेवामध्ये कला ,साहीत्य , विज्ञान ,सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे . या सन्मानाचा प्रारंभ २ जानेवारी १९५४ रोजी तत्कालिन भारताचे राष्ट्रपती Dr. राजेंद्रप्रसाद यांच्या काळात केला गेला .
सुरवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती . इ. स. १९५५ मध्ये हा नागरी सन्मान मएअणोत्तरसुद्धा देण्याची तरतुद करण्यात आली .हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तीना देण्यात येतो .सर्वपल्ली राधाक्रुष्णन याना इ . स. १९५४ साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरवण्यात आले .
‘भारतरत्न’ सन्मानप्राप्त काही सन्माननीय व्यक्ती
१ Dr . धोंडो केशव कर्वे १९५८
२ Dr . पांडुरंग वामन काणे १९६३
३ आचार्य विनोबा भावे १९८३ (मरणोत्तर)
४ Dr . बाबासाहेब आंबेडकर १९९० (मरणोत्तर)
५ लता दीनानाथ मंगेशकर २००१
६ पंडित भीमसेन जोशी २००८
७ सचिन रमेश तेंडुलकर २०१३

२१ आभाळमाया
शब्दार्थ –कोसळणे = जोरात पडणे . बरकत = लाभ भुकेकंगाल = भुकेलेले आणि पैसा नसलेले .
प्रश्न १ ला – एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) पावसाचे ढग हूऊन कोठे कोसलावे असे कवीला वाटते ?
२) शेतक-याला बरकत केव्हा येते ?
३) कवीला उजेड कोठे न्यायचा आहे ?
४) पक्ष्याकडे पाहुन कवीला काय वातते ?
५) आभाळमाया का मिळावी , असे कवी म्हणतो ?
प्रश्न २ रा – कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते ,ते ४ ते ५ वाक्यात लिहा .
अ‍) पाऊस आ) पणती इ) पक्षी
२२ होय , मीसुद्धा !
शब्दार्थ – पोटात खड्डा पडणे = खूप भीती वाटणे . पाय लटलट कापणे = भीतीने पाय थरथर कापणे . अनवाणी = पायांत चपला वैगेरे न घालता .
प्रश्न १ ला – एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) आईने मोहनला दुकानात काय आणायला सांगितले ?
२) मोहनने आकडेमोड का केली ?
३) मोहनला किती रुपये जास्त आले होते ?
प्रश्न २ रा – का , ते लिहा.
१) आईने मोहनला हाक मारली ?
२) मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली ?
३) दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली ?
प्रश्न ३ रा- खालील वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा .
१) पोटात बाकबूक होणे . अ) खूप रडणे .
२) जीव भंड्यात पडणे . आ) खूप घाबरणे .
३) ढसाढसा रडणे . इ) दिलासा मिळणे.
प्रश्न ४ था- खालील शब्दाना जोडून येणारा शब्द लिहा .
१) आकडे .--------------------- २) हात -----------------------
२) आरडा ----------------------४) कावरा --------------------- प्रश्न ५ वा- पाठात .पायात जोडे न घातलेला ‘ – या शब्दसमूहाबद्दल ‘अनवाणी ‘ हा शब्द आलेला आहे .खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द शोधून लिहा .
अ) जन्म झालेला ठिकाण ---------- जन्मस्थान .
आ) विमान चालवणारा ----------------वैमानिक .
इ) कविता करणारी ------------------ कवयित्री .
ई) शोध लावणारा ----------------- संशोधक .
उ) देशाची सेवा करणारा ------------देशसेवक .
ऊ) दवा देणारा --------------- वैद्य .
ऋ) पत्र वाट्णारा ------------------ पोस्टमन .
ऌ) शेती करणारा ------------- शेतकरी .
प्रश्न ६ वा –वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्दसमूहांची योग्य रुपे वापरा
(चेहरा कसनुसा करणे , नजर चुकवणे , अस्वस्थ होणे .)
कपबश्या कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला . त्यामुळे मी -----------झालो . चेहरा ------------------------- मी आईकडे गेलो . तिच्याशी ---------बोलू लागलो.
२३ मन्हा खांदेस्नी माटी
शब्दार्थ – मन्हा = माझ्या . वान = उणीव .
प्रश्न १ ला – एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे ?
२) खानदेशी शिवारातला ‘ सोनानी मूस ‘ का म्हटले आहे ?
३) खानदेशी माती कशासारखी आहे ?
४) खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे ?
प्रश्न २ रा – कवितेतील शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द लिहा .
जसे – माटी – थाटी .
१) ऊस -------------- २) तुकडा ----------------------- ३) भागवान ---------------- प्रश्न ३ रा – ‘भाग्य’ या शब्दाला ‘वान’ हा प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे . खालील शब्दाना ‘वान ‘ प्रत्यय लावा .
अ) बल ---------------- आ) धन -----------------------इ) गाडी ---------------------ई)गुण ----------------
२४ थोर हुतात्मे
प्रश्न १ ला – एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ?
२) १९२८ साली लाहोरमध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली ?
३) भगतसिंगानी कोणकोणत्या महविद्यालयात उच्च शिक्षण घेतले ?
४) ब्रिटिश सरकारने सुखदेव याना कशामुळे धमकावले ?
५) कोणीकोणाच्या मदतीने सुखदेवानी ‘ नौजवान ‘ भारत सभा’ स्थापन केली ?
प्रश्न २ रा –जोड्या जुळवा
‘अ’ गट ‘ब’ गट
१)राजगुरु अ‍) चौराबाजार
२)भगतसिंग आ) कानपूर
३)सुखदेव इ) खेड
४)प्रताप व्रुतपत्र ई) बंग
प्रश्न ३ रा –खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
अ) बाळकडू मिळणे .
आ) सुगावा लागणे.
इ) पाळत ठेवणे.
ई) दीक्षा मिळणे .
उ) निर्धार करणे .
ऊ) भूमिगत होणे .

४७ टिप्पण्या:

  1. लोनानायक कीताब कोणाला मीळाला

    उत्तर द्याहटवा
  2. जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसेच खालील किताब कोणाला मिळाला महात्मा, लोकमान्य, नेताजी, लोकनायक, स्वातंत्र्यवीर, क्रांतिसिंग

    उत्तर द्याहटवा
  3. क़ांतिसिंह किताब कोणाला मिळाला

    उत्तर द्याहटवा
  4. परोपकार करणे वक्यात उपयोग करा

    उत्तर द्याहटवा
  5. दिलासा मिळणे वाक्यात उपयोग सांगा

    उत्तर द्याहटवा
  6. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा .
    १) निरीक्षण करणे-
    2)कुतूहल वाटणे -
    ३) अंगाला झोंबणे

    उत्तर द्याहटवा
  7. जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसेच खालील किताब कोणाला मिळाला महात्मा, लोकमान्य, नेताजी, लोकनायक, स्वातंत्र्यवीर, क्रांतिसिंग

    उत्तर द्याहटवा
  8. 24 third hutatme ya patache balakadu milne sugava Lagne palat tevne diksha milne nirdhar karne bhumigat hone cha vakyat upyog che and saga

    उत्तर द्याहटवा
  9. स्वातंत्र्यवीर हा किताब कुणाला मिळाला

    उत्तर द्याहटवा
  10. पखरासर्खि शीळ कोण वाजवत आहे

    उत्तर द्याहटवा
  11. खानदेशी मातीला भाग्यवान का म्हंटले जाते ?

    उत्तर द्याहटवा
  12. पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे

    उत्तर द्याहटवा